“सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं”; पार्थ पवारांचा भाजपला इशारा

parth pwar

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या बहिणींवर तसेच अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. यावरून आता पार्थ पवार यांनी एक ट्विट करत भाजपला इशारा दिला आहे.

पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत ट्विट करत ते म्हणाले की, ‘सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. त्यानंतर, पार्थ यांनी शायरी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान या प्रकरणी, हिमालयापुढे सह्याद्री कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही. अजित पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु आहे. जनताच आता भाजपला प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी दिली होती. घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नसल्याचे देखील म्हणत विरोधकांना सुनावले होते.

महत्त्वाच्या बातम्या