विश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक : किसान सभा

मुंबई – गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले आहे. मात्र, घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. पूर्वानुभव पहाता यावेळी असा विश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता उपाय म्हणून कंपन्यांना अनुदानाचा निर्णय झाला आहे. मात्र, प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी दीर्घकालीन पर्यायी धोरणांची आवश्यकता आहे. दुध क्षेत्राला ७०-३० चे रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण, कल्याणकारी योजनांसाठी दुधाची सरकारी खरेदी, ब्रॅण्ड वॉरची समाप्ती, सहकारी दुधसंघामार्फत दुधाच्या प्रक्रिया उद्योगाला चालना, मुल्यवर्धन साखळीचे बळकटीकरण, दुधाची भेसळ रोखण्यासाठी निर्धारपूर्वक पावले, टोन्ड दुधावर बंदी, यासारख्या धोरणात्मक उपायांची आवश्यकता आहे. दरम्यान, घोषणा केल्याप्रमाणे दुधाला किमान २५ रुपये दर मिळावा व हा दर पुन्हा कोसळू नये यासाठी वरीलप्रमाणे धोरणात्मक उपाय करावेत, यासाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीतील घटक संघटना आपला संघर्ष सुरू ठेवेल, असे समितीने म्हटले आहे.

अॅट्रॉसिटी निर्णय: सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी