GST- वस्तूच्या पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आवश्यक

GST

वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून वस्तूंच्या किमती आणि पुरवठ्याच्या स्थितीवर सरकार देखरेख ठेवत आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर वस्तूची किंमत वाढली असेल,तर उत्पादकानं त्या वस्तूच्या पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आणि हा बदल किमान दोन वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं आवश्यक आहे, असं ग्राहक कार्य सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी कळवलं आहे. वस्तुची किंमत कमी झाली असल्यास, उत्पादकानं फक्त पाकिटावर दोन्ही किमती छापणं पुरेसं आहे.