fbpx

क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान लोकांचा गोंगाट होणं साहजिक आहे, हरकत नाही : हायकोर्ट

टीम महाराष्ट्र देशा- क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान लोकांचा गोंगाट होणं साहजिक आहे, हरकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं काल सांगितलं. विधीज्ञ कपिल सोनी यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेत आयपीएल सामन्यांच्या दरम्यान मुंबई आणि पुण्यात ध्वनी प्रदूषण मर्यादेचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता.

दरम्यान,चौकार-षटकार मारल्यानंतर लोक जल्लोष करणार हे साहजिकच आहे, अशावेळी लोकांना आनंद घेऊ द्या असं मत मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी व्यक्त केलं आणि याचिका फेटाळून लावली.