माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे – संभाजीराजे

मुंबई : मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत आज वेगळाच राडा पाहायला मिळाला. ‘सारथी’चा प्रश्न लावून धरणारे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी थेट मंत्र्यांनाच खडसावले.

मात्र खासदार संभाजीराजे यांनी या वादावर पडदा टाकत ‘माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे’ अशी भूमिका घेतली आहे. छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतः पेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घरण्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल. अस खासदार संभाजीराजे म्हणाले आहेत.

तर, समाजाने जो सारथी चा लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचं छत्रपती घरण्यावर असलेला हा विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करेन. अस देखील खासदार संभाजीराजे म्हणाले आहेत.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’ला उद्याच तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन 2020-30’ हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे सांगून यापुढच्या काळात ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला इतर मागासवर्गीय विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विचार मांडले. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

युजीसी’ने आधीचा निर्णय फिरवला; परीक्षांबाबतचे निर्णय हे कुलगुरूंच्या सहमतीनेच – सामंत

बळीराजा संकटात; बोगस बियाणांच्या हजारो तक्रारी

‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार – अजित पवार

IMP