‘सरकार पाडून दाखवणारा तो लाल अजित पवारच आहे’ ; आठवलेंचा टोला  

ramdas aathvle

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य करताना तुफान फटकेबाजी केली आहे. अजित पवार हे महाराष्ट्रभर त्यांच्या खास शैलीमध्ये  बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच ते बोलताना ‘कोण माय का लाल’ या वाक्याचा सातत्याने वापर करताना आपल्याला पाहायला मिळाले आहे.

हाच धागा पकडत रामदास आठवले यांनी अजित पवारांना यांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत,’ असा खरमरीत टोलाह आठवले यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार हे सरकार पडणार अशा वल्गणा करत आहेत. मात्र, अनेकदा वाद, मतभेद होऊनही सध्या तरी तीन पक्षांचे स्थिर दिसत आहे. मात्र, भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या रिपाईंच्या रामदास आठवलेंना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नको वाटत आहेत. त्यामुळे ते वारंवार उद्धव ठाकरेंना भाजपसोबत परत एकदा सरकार स्थापन करण्याचा सल्ला देत असल्याचे आजही पाहायला मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP