एक्सप्रेस वेवरील टोलवसूली बंद करणे अशक्य-राज्य सरकार

pune mumbai expressway

वेबटीम : मुंबई -पूणे एक्सप्रेस वेवरचा टोल बंद करणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने हायकोर्टात दिले आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने यासंदर्भातील निर्णय घ्यावा असे राज्य सरकारने हायकोर्टात सांगितले.

यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे, ही टोलवसूली तत्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, याबाबतचा करार हा कंत्राटदारासोबत करण्यात आला आहे. ज्यात 2019पर्यंत टोल वसूलीची मुदत देण्यात आली आहे. तसेच खर्च पूर्ण झाला तरी टोल वसूली मध्येच थांबवण्यात यावी अशा प्रकारचा कोणताही मुद्दा करारात समाविष्ट नाही, असे राज्य सरकारने हाय कोर्टात सांगितले.