‘मृत्युमुखींना परत आणणे अशक्य, जे आहेत त्यांना योग्य दिलासा देणार’, नारायण राणेंचा विश्वास

‘मृत्युमुखींना परत आणणे अशक्य, जे आहेत त्यांना योग्य दिलासा देणार’, नारायण राणेंचा विश्वास

रायगड : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील कोकण दौऱ्यावर आहेत. गेल्या चार दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी कौकण दौरा आखला आहे.

नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत फडणवीस, दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी राणे राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ फक्त एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही, ते म्हणजे मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही. ही दुर्दैवी बाब आहे. पण जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देऊ शकू असा मला विश्वास वाटतो.’

‘तळीये गावातील ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात, अनेकांचा मृत्यू झालेला आहे. ४४ मृतदेह आढळून आले आहेत आणि उर्वरीत मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. अधिकाऱ्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे सुरू असल्याचा दावा राणे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या