लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील

Jayant patil

टीम महाराष्ट्र देशा – लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे. १५ लाख नाही पण किमान पन्नास-साठ हजार तरी खात्यात येतील अशी अपेक्षा लोकांची होती, पण भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः स्पष्ट केलं की १५ लाख हा जुमला होता, त्यामुळे भाजपाचा खोटेपणा उघड झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.भिवंडीत परिवर्तन यात्रेदरम्यान ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशातील जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. या सरकारमध्ये जे सांगितले ते देण्याची धमक नाही, क्षमता नाही. हे सरकार पूर्णपणे खोटं बोलत आहे, याचे जनतेने थोडे चिंतन करायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.