एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढची भूमिका पडळकर करणार स्पष्ट

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुढची भूमिका पडळकर करणार स्पष्ट

गोपीचंद पडळकर

मुंबई :  एसटीचे सरकारमध्ये विलिनिकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. याप्रकरणी काल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab), एसटीचे अधिकारी, एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा अनिल परब यांनी केली. शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेईपर्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. ही पगारवाढ नोव्हेंबरपासून देऊ असंही सरकारने म्हटलं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी अंतरिम पगारवाढ मान्य नाही आम्हाला विलिनीकरणच हवं आहे या मागणीवर कर्मचाऱी ठाम आहेत.

दरम्यान, आता यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर हे सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन कर्मचाऱ्यांची भूमिका आणि पुढच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. आज सकाळी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. संपामुळे होणारे नुकसान एसटीला व कामगारांनाही परवडणारे नाही. संप मागे घेतला नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशाराही परब यांनी दिला.

मात्र अजूनही कर्मचाऱी त्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून राज्यभरात संप सुरु आहे. सरकारच्या घोषणेनंतर जे काही झालं त्याबद्दल रात्री कर्मचाऱ्यांशी चर्चा झाली. आता आणखी काही कर्मचाऱ्यांशी बोलून पुढे काय करायचं याबाबत ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. सरकारने पगारवाढीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यानं संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप सुरुच ठेवला आहे. मात्र आज पडळकर काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या