fbpx

सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक

Nawab-Malik

मुंबई : महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून सनातनचा साधक वैभव राऊतला अटक केली असून त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरुन सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे हे स्पष्ट होत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

आज महाराष्ट्र एटीएसने नालासोपारामधून सनातन संस्थेच्या साधकाला बॉम्ब आणि बॉम्बच्या साहित्यासहित अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या सरकारने या सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या सनातन संस्थेला गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय मिळत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

या सनातन संस्थेला अजुन किती लोकांची हत्या करायची आहे आणि त्यांचा आणखी कोणता कट आहे याची माहिती घ्यावी आणि सरकारने हा विषय गंभीरतेने घेवून तात्काळ या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

सनातन साधकाच्या घरात आढळला मोठा बॉम्ब साठा, घातपाताची शक्यता

नवाब मलिक यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल