औरंगाबाद:टिपू सुलतान(Tipu Sultan) हे बहादूर राजा होते त्यांच्याबद्दल फडणवीस यांनी अपशब्दांचा उपयोग केला. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.२८) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विभागीय आयुक्तांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. बसपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देशगौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच नाव महापालिकेने मैदानाला देणं अतिशय अयोग्य आहे. हे एकप्रकारे अत्याचार करणाऱ्यांचा महिमा करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे जो निर्णय घेण्यात आलाय तो रद्द केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी या नावाला विरोधच केला आहे. या पार्श्वभूमीवर बसपाद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. टिपू सुलतान हे बहादूर राजा होते. त्यांच्याबद्दल फडणवीस यांनी अपशब्दांचा उपयोग केला होता.
त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अयूब पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी फडणवीसांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, फडणवीस हाय हाय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिले. महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. टिपू सुलतान मुस्लिम होते म्हणून त्यांचे नाव क्रीडा संकुलास देण्यास भाजपाचा व हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे. त्या विरोधाचा आम्ही निषेध करतो. क्रीडा संकुलास त्यांचेच नाव राहावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. असले राजकारण करुन भाजप वातावरण दुषित करत असल्याचा आरोप केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
मालाड येथील मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाला वीर टिपू सुलतान नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यावरुनच महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आले आहे. या क्रीडांगणाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने तीव्र विरोध केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
संविधानाची पायमल्ली करीत हुकूमशाही ‘मविआ’ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही चपराक- गिरीश महाजन
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृतदेह बंगळुरूमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय
FIFA WC 2022 : वर्ल्डकप पात्रता फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाचा चिलीवर विजय
अजिंठ्याची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून आदित्य ठाकरेंनाही आवरला नाही मोह; कॅमेऱ्यात टिपली क्षणचित्रे!
कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब