कम्युनिस्ट विचारधारेला उखडून फेकायला हवे- सुनील देवधर

Sunil-Deodhar

मुंबई: त्रिपुरामध्ये विजय खेचून आणणारे विधान भाजपचे त्रिपुरा राज्यातील प्रभारी सुनील देवधर यांनी कम्युनिस्ट विचारधारेला उखडून फेकायला हवे, या विधानावर आजही ठाम असल्याचे सांगितले. तसेच भाजपची विचारधारा देशभक्तीची आहे. त्यात येणारे अडथळे फेकून द्यायला हवेत, असेही ते म्हणाले. सुनील देवधर मंगळवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले सुनील देवधर ?

भाजपची विचारधारा देशभक्ती आणि मातृभूमीशी संबंधित आहे. त्यात काटा बनणाऱ्यांना हटवणे हे आमचे काम आहे. ते आमचे पहिले कर्तव्य आहे. याचा अर्थ कम्युनिस्ट विचारधारा मानणाऱ्यांना संपवणे नाही; तर ती विचारधारा संपवणे हा आहे. एखादी विचारधारा पसरवण्यासाठी आपण काम करत असतो. लोकांनी ती स्वीकारल्यास दुसरी विचारधारा आपोआप संपेल.