मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच; फडणवीसांच्या डोक्यावर पवारांचा हात

Devendra fadnvis and sharad pawar pune

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर पेटलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलाची हालचाल सुरु झाली असल्याच वक्तव्य केल्याने फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राजकीय पंडित अशी बिरुदी असणारे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा दिला आहे.

‘येत्या काळात निवडणुका आहेत, भाजपाने मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच होईल’. फडणवीस चांगलं काम करताहेत, जनमानसांत त्यांची प्रतिमाही चांगली आहे, त्यामुळे त्यांना बदलणं भाजपासाठी धोक्याचं ठरू शकतं, अस वक्तव्य करत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दिलासाच दिला आहे. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केल आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

पवारांनी माझ्या कॉलरचे अनुकरण केले. हे बास झाले. अजून काय पाहिजे ? : उदयनराजे

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?