‘हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळणेही अवघड झाले आहे आणि हे अकाल्पनीक आहे’

vihari

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

अशा कठीण परिस्थितीत अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले. भारताचा महत्त्वाचा खेळाडू हनुमा विहारी आपल्या मित्रांच्या व चाहत्यांच्या मदतीनं कोरोना रुग्णांना मदत करत आहे. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची सोय करण्यापर्यंत सर्व मदत विहारी व त्याचे सहकारी करत आहेत.

कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी ब्रिटनमध्ये असूनही विहारीनं ट्विटर हँडलच्या मदतीनं 100 स्वयंसेवकाची टीम तयार केली आहे. पीटीआयशी बोलताना त्याने सांगितले की,”मला माझ्या कामाचा गाजावाजा करायचा नाही. ज्यांना या संकटकाळात खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी आम्ही मदत करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे. कोरोनाची दुसरी लाट एवढी भयंकर आहे की, हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळणेही अवघड झाले आहे आणि हे अकाल्पनीक आहे. म्हणूनच माझ्या फॉलोअर्सचा स्वयंसेवक म्हणून उपयोग करून घेताना अधिक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.” भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रिषभ पंत, देखील अशा परिस्थतीत मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP