‘….यामुळे शतकाचा विचार सोडुन दिला’ सामन्यानंतर धवनने केला खुलासा

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

कर्णधार म्हणून शिखर धवनने या सामन्यात भारताकडून सर्वाधीक धावांची खेळी केली. अखेरच्या चेंडुपर्यंत धवन ८६ धावांंवर नाबाद राहीला. या सामन्यात जर वेगवान खेळी केली असती तर धवनचे शतक पुर्ण झाले असते अशी चर्चा सुरु होती. सामना संपल्यानंतर बोलताना धवनने यासंदर्भात खुलासा केला. ‘खेळपट्टीवर खेळताना शतकाचा विचार आला होता. मात्र तेव्हा जास्त धावा शिल्लक नव्हत्या त्यामुळे मी नाबाद राहण्याचा निर्णय घेतला’ असे धवन म्हणाला.

या सामन्याबद्दल बोलताना त्याने भारतीय संघाच्या फिरकीपटुंचे कौतुक केले. ‘खेळपट्टीवर चेंडु चांगला वळत होता. त्याचा फायदा घेत १०व्या षटकापासुन फिरकीपटूनी चांगली गोलंदाजी करत सामन्यात आघाडी मिळवून दिली.’ असे धवन म्हणाला. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखुल सहज पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP