पुण्यात १२ व्या मजल्यावरून उडी मारून आयटी इंजिनिअरचे सुसाईड !

टीम महाराष्ट्र देशा : एका आयटी इंजिनिअरने १२ व्या मजल्यावरून उडी मारून सुसाईड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल आर. ग्रीन सोसायटीमध्ये दुपारी १२ जण्याच्या सुमारास घडली.

रोहित बापुराव पाटील (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या आयटी इंजिनिअरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत कामाला होता. तो त्याच्या भावासोबत राहत होता. रोहित ने १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली परंतु त्याच्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तरी वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.