आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती- नरेंद्र मोदी

blank

टीम  महाराष्ट्र  देशा – भारतात आता व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे. आताच्या इतकी व्यवसाय सुलभता भारतात यापूर्वी कधीच नव्हती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.‘वर्ल्ड फूड इंडिया’ परिषदेला शुक्रवारी येथे थाटात प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात मोदी बोलत होते. ही परिषद तीन दिवस चालणार असून, खाद्य क्षेत्रातील जगभरातील कंपन्यांना परिषदेसाठी निमंत्रित केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जागतिक बँकेने जारी केलेल्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने ३0 स्थानांची प्रगती करून १00 व्या स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वी भारत १३0 व्या स्थानी होता. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील वक्तव्य केले.