कोणी कोणाला भेटल्यास आम्हाला काही फरक पडत नाही – रावसाहेब दानवे

औरंगाबाद : कोणीही कोणाला भेटू शकतो. शरद पवार हे उद्धव ठाकरेंना भेटण्यास आमचा आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. कोणी कोणाला भेटले तरी काही फरक पडणार नाही. आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसला नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण आम्ही नोटबंदी करताना फक्त श्रीमंतांच्या 500, 1000 च्या नोटा बंद केल्या. परंतु काँग्रेसने नोटबंदी केली तेव्हा तर गरिबांचे चार आणे, आठ आणेही बंद करून टाकले होते, असे दानवे म्हणाले.