इस्त्रो २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला अंतराळात पाठवणार – के सिवन

टीम महाराष्ट्र देशा : इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवेल अस विधान केले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढणार आहे असंही सिवन यांनी म्हटले आहे ते भुवनेश्वर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना सिवन यांनी ‘डिसेंबर २०२१ पर्यंत भारत स्वतःच्या रॉकेटमध्ये पहिल्या भारतीयाला अंतरळात पाठवेल. हे आमचं ध्येय आहे. इस्रोतील प्रत्येकजण यासाठी काम करत आहे अशी माहिती दिली. तसेच डिसेंबर २०२० पर्यंत इस्रोकडे पहिली मानवरहित मोहिम तयार असेल. दूसरं मानवरहित मानव अंतराळ विमान जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येईल. गगनयान मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या मोहिमेमुळे देशाच्या विज्ञान आणि औद्योगिक क्षमतांमध्ये वाढ होईल अस सिवन म्हणाले आहेत.

दरम्यान भारताची ही गगनयान मोहिम पूर्ण झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी मोहिम करणारा भारत चौथा देश असेल त्यामुळे भारताची ताकद जगामध्ये वाढणार आहे. या मोहिमेसाठी भारतीय वायू सेनेनी अंतराळवीराची निवड प्रक्रिया सुरु केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे अंतराळवीराची निवड लवकरच होऊन त्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी बनावटीचे चांद्रयान २ हे यान चंद्रावर पाठवले होते. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला इस्त्रो आणि विक्रम यांच्यातील संपर्क तुटला त्यामुळे देशातील नागरिकांची निराशा झाली आहे. त्यामुळे इस्त्रो चांद्रयानसह अनेक मोमा राबवत आहे.

महत्वाच्या बातम्या