मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. काल १५ जून रोजी आदित्य ठाकरे हे अयोध्येत दाखल झाले. शरयू नदी काठी त्यांच्या हस्ते आरती पार पडली. यावेळी अयोध्येत शिवसैनिकांकडून हलगी आणि ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान अयोध्या येथून आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद ही घेतली. ‘जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेच हिंदुत्व आहे आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले होते. आदित्य ठाकरे यांच्या याच विधानावरून मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गजानन काळे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा घेरले आहे. काळे यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटे नवाब असा केला आहे. काळे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेच हिंदुत्व – छोटे नवाब. मग औंरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय मशिदीवरचे भोंगे कधी उतरणार? आणि रस्त्यावरचा नमाज कधी बंद होणार? आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेच्या हिंदुत्वात बसत नाही का?”
जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेच हिंदुत्व … छोटे नवाब …
मग औंरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय…?मशिदीवरचे भोंगे कधी उतरणार
आणि रस्त्यावरचा नमाज कधी बंद होणार… ?आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेच्या हिंदुत्वात बसत नाही का ?
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 16, 2022
गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे नवाब असे केल्याने, यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या अधिकृत प्रवक्त्याने आदित्य ठाकरे यांना छोटे नवाब म्हणून डिवचल्यानंतर आता यावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते ? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<