fbpx

मोदी पंतप्रधानपदी राहिल्यास आयएसआयला आनंदचं – असद दुर्रानी

narendra modi narendra modi likely-to-go-for-cabinet-expansion

कराची – नरेंद्र मोदी हे एक कट्टरतावादी नेते असून, ते पंतप्रधानपदी राहिल्यास देशात कायम अशांतता राहील, त्यामुळे जगात भारताची प्रतिमा मलीन होऊन त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. म्हणून मोदी पंतप्रधानपदी राहिल्यास पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयला आनंदचं आहे. असं वक्तव्य आयएसआयचे माजी महासंचालक असद दुर्रानी यांनी केलं आहे. मोदी म्हणजे लबाड कोल्हा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

असद दुर्रानी यांनी भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी प्रमुख ए. एस दुलत यांच्यासोबत एका पुस्तकाचे लिखाण केले आहे. ‘द स्पाय क्रॉनिकल’ असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकात त्यांनी भारत- पाक संबंध, दोन्ही देशांमध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल, लादेनसाठी पाकमध्ये अमेरिकेने राबवलेली मोहीम अशा विविध घटनांवर भाष्य केले. दोन्ही देशांमधील गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या दृष्टीकोनातून हे पुस्तक लिहीण्यात आले आहे. याच पुस्तकात त्यांनी मोदींबाबतच्या या वादग्रस्त विधानाचा उल्लेख केला आहे.