पाकला वाजपेयी पंतप्रधान म्हणून लाभायला पाहिजे होते – माजी आयएसआय प्रमुख दुर्रानी

कराची – पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी भारतचे माजी पंतप्रधान अट्टल बिहारी वाजपेयींचं कौतुक केलय. अट्टल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता पाकिस्तानला पंतप्रधान म्हणून लाभला असता तर खूप चांगले झाले असते असं ते म्हणाले आहेत.

गुप्तहेर संघटनांवरचं पुस्तक ‘ Spy Chronicles RAW, ISI and the Illusion of peace’मध्ये दुर्रानी आणि भारतीय गुप्तहेर संघटना राॅचे माजी प्रमुख एएस दुलत यांची बातचीत छापलीय. या दोघांचा समन्वय साधलाय पत्रकार आदित्य सिन्हांनी.या पुस्तकामध्ये दुर्रानी यांनी म्हंटलं आहे की, पाकिस्तानला कविमनाचा, दूरदृष्टी असलेले वाजपेयींसारखे पंतप्रधान मिळाले असते, तर खूप बरं झालं असतं.

या पुस्तकात त्यांनी मोदी आणि मनमोहन सिंग यांची तुलना केलीय. त्यात त्यांनी म्हटलंय, मोदींनी भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी जास्त काम केलंय. आपल्या मुलाखतीत मोदीच दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असंही ते म्हणालेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...