अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, ‘संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा…’

मुंबई : ‘सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे,’ अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा’.

‘पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा,’ असं कपूर म्हणाले.