IND vs NZ : दुसऱ्या कसोटीआधी भारताला झटका, दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

ख्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र सामन्याच्या ऐन पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा आघाडीचा गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, इशांतच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला भारतीय संघात स्थान मिळू शकते.

Loading...

दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना भारताला जिंकणे अत्यावश्यक आहे. मात्र शर्माच्या दुखापतीने विराटची चिंता वाढवली आहे. क्रिकबझने हे वृत्त दिले आहे. उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे इशांत शर्माला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे.

मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकावा लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात इशांतने ६८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांना फार यश मिळाले नव्हते आणि भारताचा १० विकेटनी पराभव झाला.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती