दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

ख्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. मात्र सामन्याच्या ऐन पूर्वसंध्येला भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा आघाडीचा गोलंदाज इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने तो दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना भारताला जिंकणे अत्यावश्यक आहे. मात्र शर्माच्या दुखापतीने विराटची चिंता वाढवली आहे. क्रिकबझने हे वृत्त दिले आहे. उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे इशांत शर्माला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे.

Loading...

दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा घोट्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. अशा वेळी भारतीय संघाकडे उमेश यादव आणि नवदीप सैनी हे दोन चांगले वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांपैकी उमेश यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात इशांतने ६८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांना फार यश मिळाले नव्हते आणि भारताचा १० विकेटनी पराभव झाला. रणजी क्रिकेट स्पर्धा २०१९ मध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याचसोबत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतही त्याने भेदक मारा केला होता. त्यामुळे उमेश यादवचा अंतिम ११ मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं