fbpx

…आणि ऋषभ पंतने पूर्ण केलं टीम पेनचं ‘बेबीसीटिंग’चं चॅलेंज

टीम महाराष्ट्र देशा : मैदानावर घडणारे वाद मैदानातच सोडून द्यायचे असतात याच उत्तम उदाहरण भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने घालून दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत यांच्यातली बाचाबाची स्टंपच्या माईकमध्ये कैद झाली होती. सोशल मीडियावर या शाब्दिक खेळीची खूप चर्चा होती.

मेलबर्न कसोटीदरम्यान पेन आणि ऋषभ यांच्यात बेबीसीटिंगवरून शेरेबाजी रंगली होती. मात्र मैदानावरच्या शत्रूत्वाला कटू वळण न देता हलक्याफुलक्या स्वभावाची झलक ऋषभने सादर केली आहे.

काय म्हणाला होता टीम पेन ?

‘एक गोष्ट सांगू. एकदिवसीय सामन्यांसाठी आता महेंद्र सिंग धोनीची निवड झाली आहे. ऋषभ पंतला आता हॉबर्ट हरिकेन्स संघात सामील करायला हवं. त्यांना एका फलंदाजाची गरज आहे. यामुळे तुझा ऑस्ट्रेलियातला हॉलिडे लांबेल. हॉबर्ट सुंदर शहर आहे. याला एक वॉटर-फ्रंट अपार्टमेंट देण्याचंही बघू.’ यानंतर टीमने ऋषभला विचारलं, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकशील का? मी माझ्या पत्नीला पिक्चरला घेऊन जाईल, तेव्हा तू माझ्या मुलांना सांभाळत जा.

यानंतर ऋषभ पंतने टीम पेनच्या दोन मुलांसोबत त्यांना सांभाळताना फोटो काढला आहे. आणि तोच फोटो आयसीसीने आपल्या ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे.