भारतीय संघात इशानला स्थान; आईवडिलांना अश्रु अनावर

ईशान किशन

पटना : सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची टी२० मालिका खेळविली जाईल. या मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळणारे इशान किशन, सुर्यकुमार यादव आणि राजस्थान राॅयल्सकडून खेळणारा राहूल तेवतिया यांना टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे

इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळाल्याची बातमी कळताच इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर झाले. ही बातमी सर्वप्रथम इशानच्या वहिनीला कळाली. बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती दिली होती. त्यानंतर लगेच इशानने फोन करून ही माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना अश्रु अनावर झाले.

लहानपणापासून इशानला भारतासाठी खेळायचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. यासाठी त्याने खूप मेहनत केली होती. नववीत असताना त्याची परीक्षा आणि मॅच दोन्ही होत्या. परीक्षाला न आल्यास शाळेतून काढण्यात येईल असं शिक्षकांनी सांगितलं असताना देखील त्याने क्रिकेट खेळायचा निर्णय घेतला. यात त्याला त्याच्या वडिलांची मोलाची साथ लाभली. दरम्यान, जोपर्यत इशान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नाही तो पर्यत मी त्याची मॅच बघायला जाणार नाही, अस त्याच्या आईने सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या