राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? निरुपमांचा देवरांवर निशाणा

Sanjay Nirupam

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी मिलिंद देवरा हे दिल्लीत जाऊ शकतात. राजीनाम्या संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती आहे.

Loading...

या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राजीनाम्यात त्यागाची भावाना अंतर्भुत असते, मात्र इथे तर दुसऱ्याच क्षणी राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षाने सावध राहायला हवे असं म्हणत निरुपम यांनी देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे.Loading…


Loading…

Loading...