मुंबई : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र,पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, राजकीय वातावरण तापले आहे.युवा सेनेने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा मावळली आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांवरून शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेने मुंबईतील वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Mumbai: Yuva Sena, the youth wing of Shiv Sena puts up banners stating 'Yahi hai acche din?' at various petrol pumps and roadside in Bandra West pic.twitter.com/yAqMTacCZS
— ANI (@ANI) February 22, 2021
युवा सेनेने वांद्रे परिसरातील रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर छोटे होर्डिंग्ज लावले आहेत. २०१५ आणि २०२१ मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत या होर्डिंग्जवर दाखवून देत युवा सेनेने हेच आहेत अच्छे दिन? असा उपरोधिक सवाल केला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर २०१५ मध्ये ५७२ रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता ७१९ रुपयांपर्यंत वाढल्याचे पोस्टरवर म्हटले आहे. त्याबरोबरच २०१५मध्ये प्रती लिटर ५२ रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर २०२१मध्ये ८८.०६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर ६४.६० रुपये प्रती लिटर मिळणाऱ्या पेट्रोलचे दरही आता ९६.६२ रुपयांवर गेल्याचे युवा सेनेने पोस्टरमधून म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- जालनेकरांनो नियम पाळा; ९६ नवे बाधित रुग्ण, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू
- परभणीत आढळले २१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू
- राज्यात २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू, तरी महाराष्ट्र बिनधास्त!
- ‘जनाबाई जाधवांच्या कविता या वेदनेतून उगवलेल्या’