मुंडे यांच्या ‘रॉ’ मार्फत चौकशीच्या मागणीत तथ्य आहे का? यावरच प्रश्न चिन्ह

टीम महाराष्ट्र देशा : (प्रवीण डोके) लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप अमेरीकेतून सायबर तज्ञ सय्यद शुजा याने लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत केले आहेत. त्यामुळे आता देशात चांगलेच वातावरण तापले आहे.

Loading...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याची चौकशी ‘रॉ’ मार्फत झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. परंतु ‘रॉ’च्या माध्यमातून अशा प्रकरणाचा तपास करून, चौकशी केली जाऊ शकते का? असा मुद्दा आता या निमित्ताने पुढे येत आहे.

‘रॉ’ संघटना देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारी एक गुप्तहेर संघटना आहे इतकच आपल्याला माहिती असते. परंतु रिसर्च अँड अॅनलीसीस विंग अर्थात ‘रॉ’ (RAW) ही गुप्तचर संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तपणे काम करत असते. तिचे एजंट आपल्यातलेच एक बनून हेरगिरी करत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही महत्वाच्या घडामोडींवर त्यांची नजर असते. अतिरेकी हल्ले, युद्ध यांची अप-टू-डेट माहिती काढण्याचं काम RAW करते.

‘रॉ’ संघटना हि गुप्तहेर संघटना आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच काम करते. त्यामुळे ‘रॉ’ने आतापर्यंत भारतातील एखाद्या प्रकरणाबद्दल तपास यंत्रणेचे काम केले नाही. ‘रॉ’ गुप्तहेर संघटना असून ती तपास यंत्रणा नाही, त्यामुळे ‘रॉ’ मार्फत अशा प्रकरणाचा अद्यापतरी तपास झालेला नाही.

धनंजय मुंडे यांनी ‘रॉ’ मार्फत चौकशी झाली पाहिजे या मागणीत तथ्य आहे का? यावरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

धनंजय मुंडे म्हणले होते की, धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हे प्रकरण एका मोठ्या लोकनेत्याचा मृत्यू तसेच सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांशी संबंधित असल्याने याची ‘रॉ’ मार्फत चौकशी झाली पाहिजे.

मुंडे साहेब यांचा मृत्यू हा अपघाती नाही, त्यात घातपात असावा अशी शंका साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस होती. त्यामुळे सायबर तज्ञ सय्यद शुजा यांनी लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत जे गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहे त्याने या शंकेला पुष्टी मिळाली.

 Loading…


Loading…

Loading...