जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नोकरभरतीत घोटाळा? खडसे म्हणाले…

eknath khadase

जळगाव : दूध संघाच्या संचालक मंडळाने कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप जस्टीस फॉर पीपल्स संस्थेने केला आहे. जळगाव दूध संघाच्या संचालक मंडळाने 163 जागांसाठी सुरू केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केला आहे , असा आरोप ‘जस्टीस फॉर पीपल्स’ संस्थेचे एन. जे. पाटील यांनी केला आहे.

६३ कर्मचाऱ्यांच्या यादीसह त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. भरती प्रक्रियेत आरक्षणाचे तत्व देखील पाळला जात नाही. त्यामुळे ही भरती त्वरित थांबवावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

दरम्यान, या आरोपांना माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. दूध उत्पादक संघाची भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्नच नाही, संगणकात घोटाळा असेल तर तो उघड करावा. असं खडसे म्हणाले.जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये अजून नोकरभरतीच झालेली नाही तर या प्रक्रियेत गैरव्यवहार कसा होणार असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

खडसे म्हणाले,जळगाव जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली. त्यात 250 जागा भरण्यात आल्या. दूध उत्पादक संघाची भरतीदेखील त्याच धर्तीवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. संगणकात घोटाळा असेल तर तो उघड करावा. अजून भरती झालेली नाही. पाच ते दहा वर्षे संघात सेवा बजावलेल्यांना प्राधान्य देण्याचे हे स्पष्ट आहे; परंतु त्यांना परीक्षा द्यावी लागेल. त्यात पास झाले तरच त्यांना संधी मिळेल. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणी पैसे मागत असेल तर त्वरित पोलिस दलाला कळवावे असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

IMP