‘महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरु आहे का’?; अशिष शेलारांचा टोला

अशिष शेलार

मुंबई : मुंबईच्या समुद्रातील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खालना अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात काय पोलीस पोलीस खेळ सुरु आहे काय? अशी टीका भाजप आमदार अशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार ट्विटमध्ये म्हणतात, ‘तक्रारदारावरच पोलीसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या. माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलीस अजूनही मागावरच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलिसांकडून पाठलाग. महाराष्ट्रात काय "पोलीस-पोलीस" खेळ सुरु आहे का?’ असा टोला शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

याबाबत समीर वानखेडे बोलताना म्हणाले, माझ्यावर बेकायदेशीर पद्धतीनं पाळत ठेवली जात आहे. मुंबई पोलीस दलातील काही पोलीस साध्या वेशात वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेटही घेतली आहे.

ओशिवरा पोलीस स्थानकातील २ पोलीस समीर वानखेडेंच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत. समीर वानखेडेंनी यासंदर्भात तक्रार करताना एक सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेतला आहे. त्यामुळे सध्या समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या