राज्यातील पोलीस खाते नेमकं करतंय काय? ; उद्धव ठाकरे

udhav thakrey

मुंबई : कमला मिल प्रकरणातील पब मालक सापडत नसतील तर राज्यातील पोलीस खाते नेमकं करतंय काय? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी उपस्थित केला आहे. कमला मिल प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आरोपींना अटक होत नाही तर राज्य सरकारवर राजकीय दबाव आहे का हे पाहावे लागेल. असेही ते म्हणाले.

कामाला मिल कंपाऊंडमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो’ या पबमध्ये २९ डिसेंबर ला आग लागली होती. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र अद्याप आरोपींना अटक झाली नसून या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कमला मिल आगीवर भाष्य केले. कमला मिल प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून आरोपींना अटक न झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाना साधला आहे.