राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? केजारीवालांचा खोचक प्रश्न

टिपू सुलतानच्या चित्राला भाजपचा विरोध

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? ज्याचे चित्र आम्ही विधानसभेत लावू शकू? असे खोचक प्रश्न विचारत अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस व भाजपवर टीका केली. विधानसभेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७० चित्रणाचे अनावरण करण्यात आले होते. त्या चित्रांमध्ये टिपू सुलतानचे चित्र असल्याने भाजपने त्यावर आक्षेप घेतला होता.

दिल्ली विधानसभेत लावण्यात आलेल्या या चित्रांमध्ये बिरसा मुंडा, भगत सिंग, राणी चेन्नम्मा, सुभाषचंद्र बोस यांच्याही चित्रांचा समावेश आहे. मात्र टिपू सुलतानचे चित्र या चित्रांमध्ये का समाविष्ट केले? असा प्रश्न विचारत भाजपने यावर आक्षेप नोंदवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वातंत्र्य सैनिकांचे नाव सांगा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले अशा संघाच्या नेत्यांची नावे सांगा असे बोलत आपचे नेते सौरभ भारतद्वाज यांनी भाजपवर टीका केली. आम्ही भाजपला म्हटले होते. मात्र भाजपने यावर काहीही उत्तर दिले नाही. भाजपला अकारण वाद निर्माण करण्यात रस आहे अशी टीका राम निवास गोयल यांनी केली. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. मग दिल्ली विधानसभेत टिपू सुलतानचे चित्र लावण्यात आले तर त्यात गैर काय? असाही प्रश्न गोयल यांनी उपस्थित केला. तसेच भाजपवर टीकाही केली.