तृणमूलच्या नुसरत जहांच्या अफेअरची ज्याच्यासोबत चर्चा आहे तो व्यक्ती भाजपचा नेता आहे का ?

yashdasgupta

कोलकाता – २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून नुसरत जहां खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.

नुकतेच पती निखिल जैन यांच्यावर वेगवेगळे आरोप करत, आपलं लग्नच कायदेशीररित्या वैध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभेच्या वेबसाईटवर देखील पश्चिम बंगालच्या खासदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे आणि त्यामध्ये त्या विवाहीत असून त्यांच्या नवऱ्याचं नाव निखिल जैन असल्याचं म्हटलंय.

दरम्यान,बोल्ड आणि बिनधास्त असणाऱ्या नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसी आणि नात्याबद्दल जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत. नुसरत जहां यांचे नाव एका नव्या व्यक्तीशी जोडले जात आहे. यश दासगुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. यश दासगुप्ता अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे.

बॉलिवूडमध्ये काम करण्याबरोबरच यश दासगुप्ताने बंगाली सिनेमांमध्येही काम केले आहे.जेव्हा 2020 मध्ये यशने SOS कोलकाता नावाचा चित्रपट केला तेव्हा त्या काळात त्याची नुसरतशी जवळीक वाढली. 2021 मध्ये झालेल्या बंगाल निवडणुकीत यशने भाजपकडून हुगली जिल्ह्यातील चंडी तल्ला इथून निवडणूक लढवली होती. पण त्याला यात त्याला यश मिळाले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या दोघांनी एकत्र अजमेर शरीफ सह इतर काही शहरांना भेट दिली होती.

महत्वाच्या बातम्या

IMP