मुंबई : मराठी भाषा आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आता राज्य सरकारने आता मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला असून यापुढे सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काल(१३ जाने.) मनसेप्रमुख राज ठाकरेंनी(Raj Thackeray) राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत अभिनंदन केले. तसेच याविषयी आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील भाष्य केले असून पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?’, असे देशपांडे म्हणाले आहेत.
ज्या व्यापारांचा मराठी पाटी ला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 14, 2022
तसेच काल याविषयी ट्विट करत राज ठाकरे म्हणाले की,’ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच.’
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk
— Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’महाराष्ट्र सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. यामध्ये आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा-पुन्हा आम्हाला करायला लावू नका’, असेही ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “गिरे तो भी टांग उपर”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांना टोला
- “उत्तरप्रदेशातील उपेक्षित, शोषित समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध”
- “ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा”, पंतप्रधान मोदींचा इशारा
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<