‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय ?’

nitesh rane and uddhav thakrey

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.

यावरून भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी संशय घेतला आहे. ‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते. आतापर्यंत त्यांना कधीही कोरोना झाला नाही. अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच त्यांना कोरोना झाला. छगन भुजबळांनाही नेमका सकाळीच झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या