‘आता सांगा, मुंबईच्या तुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की…?’; दरेकरांचा सवाल

darekar vs thackeray

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे, मुंबईतील सखल भागांसह उपनगरांमध्ये देखील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे मुंबईची पुन्हा तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लोकल सेवेसह रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून सामान्य मुंबईकरांना यंदा देखील या समस्येमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे. तर, भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सायन सर्कल आणि हिंदमाता परिसरात गुडघ्याभर पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे.

‘फडणवीस सरकार राज्यात सत्तेत असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी मुंबईत पाणी तुंबण्याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण ? मुख्यमंत्री कि महापालिका ? हाय-टाइड आणि अति पावसाने पाणी तुंबल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मुंबईसाठी हे नवीन नाही. प्रकल्प अपूर्ण असल्याने मुंबईकरांना या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे आता तरी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था तात्काळ महापालिकेने करावी,’ अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP