मुंबई : देशात कोरोना लसीचे १०० कोटी डोस पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं लाल किल्ल्यावर जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १०० कोटी लसींचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याच्या आनंदाप्रित्यर्थ दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर जगातील सर्वात उंच झेंडा फडकावला जाणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-काश्मीरामध्ये मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? तुमचा तो निकाह म्हणे व्यापक राष्ट्रीय हितासाठी! तेथे तर सरळ सरळ फुटीरतावादी, अतिरेक्यांशी हातमिळवणी करूनच सत्तेचा शिरकुर्मा चापला होता. त्या शिरकुर्म्याची दातांत अडकलेली शिते तशीच ठेवून शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण आहे.
आज फक्त हिंदू खतऱ्यात नसून भारत खतऱ्यात आहे! १०० कोटी लसींचे उद्दिष्ट पूर्ण झाले म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशातला सगळ्यात मोठा तिरंगा लालकिल्ल्यावर फडकविला हे योग्यच झाले, पण चिनी, पाकडे, बांगलादेशी ज्या बेदरकारपणे सीमेवर धडका मारीत आहेत ते पाहता तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे काय? याचा विचार करावा लागेल, असं लेखात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत’
- अंमली पदार्थांच्या आडून राज्याला बदनाम करण्याचा डाव- मुख्यमंत्री ठाकरे
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी