मंत्रीपद मिळणार कि नाही? नारायण राणे चिंतेत

rane press mumbai

मुंबई : नारायण राणे चांगलेच वैतागले आहेत. कधी एक दिवस मंत्री मंडळात जोतो. या आशेची निराशा होते कि काय? यामुळे राणे चिंतेत असून त्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.’ अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिलं आहे.

Loading...

नारायण राणे यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. मात्र हि चर्चा काही खरी उतरतांना दिसत नाही. त्यामुळे राणे चांगले संतापले आहेत. काल नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मंत्रीपदाबाबत प्रश्नही विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना राणे म्हणाले,  ‘मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. माझी सहनशीलता संपण्याच्या आत निर्णय घ्या. असं मी त्यांना सांगणार आहे.’ असं राणे यावेळी म्हणाले. दरम्यान, आता राणेंच्या या पवित्र्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...