मोदींनी खरंच २०१४ च्या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ?

टीम महारष्ट्र देश : निवडणुका म्हटलं कि आरोप -प्रत्यारोप, मोठमोठी आश्वासने, टीका, चर्चा या ठरलेल्याच. परंतु त्यालाही काही सीमा असाव्यात, सरळ सरळ जनतेला खोटी स्वप्ने दाखवून त्यांची दिशाभूल करणे हे कितपत योग्य ? यामुळे लोकांचा राजकारणावरील आणि नेत्यांवरील विश्वास उडत चाललेला दिसतो आहे.

आधुनिक काळात पुराव्यांचे जतन करणे तुलनेने सोपे झालेले आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या पुराव्यांच्या मदतीने दुध का दुध और पाणी का पाणी व्हायला  वेळ लागत नाही. परंतु तेच पुरावे जनतेसमोर कशा पद्धतीने मांडले जातात. त्यात काही फेरफार केले आहेत का हे तपासून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

भारतात अनेक वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. संधी होती तेव्हा त्यांना जनतेच्या मनात जागा करण्यात अपयश आले आणि याचाच परिणाम म्हणून मोठमोठ्या आश्वासनांच्या मोहात पडून जनतेने नव्या हाती सत्ता दिली. आता पुन्हा तोच प्रश्न ! या नव्या सरकारने कोणती कामे केली आणि कोणती नाही, कशाप्रकारे जनतेला गाजर दाखवत सत्ता मिळवली आणि आता त्यांचा कारभार पाहिल्यानंतर जनतेला त्यांच्या बद्दल काय वाटते ?

देशातील त्यापैकीच एक महत्वाची आणि वर्षानुवर्षे चालत आलेली समस्या म्हणजे ‘शेतकरी आत्महत्या’. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि देशातील शेतकरीच जर का आत्महत्या करत असेल तर हे सरकार किती अपयशी आहे ते समजायला वेळ लागत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांंना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ? आमचे सरकार येताच शेतकऱ्यांंचे कर्ज माफ केले जाईल असे मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते का ? हे प्रश्न यासाठी विचारले जात आहेत. कारण सध्या सोशल मिडीयावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मोदी शेतकऱ्यांंच्या कर्जमाफी बद्दल बोलताना दिसत आहेत.

काय म्हणताहेत मोदी या व्हिडिओत ?

मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद…पहली ही मीटिंग में पहला ही काम… किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद… मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए.’

यही है वो वीडियो आखिर मिल ही गया इसी बात पर किसानों ने 2014 में मतदान किया था असे म्हणत हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. ज्या पद्धतीने हा व्हिडिओ सर्वांसमोर मांडण्यात आलेला आहे त्यावरून असेच वाटत आहे कि मोदींनी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते.

काय आहे व्हिडिओ चे वास्तव ?

या व्हिडिओ ची पडताळणी केली असता हा व्हिडिओ खोटा नसल्याचे समोर आलेले आहे. परंतु या व्हिडिओ सोबत छेडछाड करण्यात आली असून या व्हिडिओचा सुरुवातीचा काही भाग हा कट करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ १३ फेब्रुवारी २०१७ मधील आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी लखीमपुर खीरी येथे केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी आपल्या भाषणात मोदींनी उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.

यही है वो वीडियो आखिर मिल ही गया इसी बात पर किसानों ने 2014 में मतदान किया था??????

Haryana Congress Vyapar Cell-Sirsa ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 4, 2019

‘आपने मुझे उत्तर प्रदेश का सांसद भी बनाया है. तो उत्तर प्रदेश के सांसद के नाते. लखीमपुर के और उत्तर प्रदेश के मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद़…पहली ही मीटिंग में पहला ही काम… किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद… मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए.’ असे ते आपल्या भाषणात म्हटले होते.
हा पाहा मोदींच्या त्या भाषणाचा पूर्ण व्हिडिओ

त्यामुळे जनतेने पडताळणी करून मगच विश्वास ठेवायला हवा हे या उदाहरणावरून लक्षात येते.