पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना, प्रमोद मुतालिक यांच्या वक्तव्यावरून नवा वाद

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे जबाबदार, असा सवाल श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केला आहे.मुतालिक यांनी हे खळबळजनक वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे.आपल्या वक्तव्यातून मुतालिक यांनी गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना केल्यामुळे देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.

नेमकं काय म्हणाले प्रमोद मुतालिक

कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन-दोन हत्या झाल्या. त्या प्रत्येकवेळी तिथे काँग्रेसची सत्ता होती. पण कोणीही काँग्रेस सरकारच्या अपयशाबाबत प्रश्न उपस्थित केला नाही. उलट तेच आता गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन का बाळगले, असा सवाल करत आहेत. कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्यालाही मोदीच जबाबदार आहेत का?

You might also like
Comments
Loading...