Let’s talk – मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र खरंच हगणदारीमुक्त झाला आहे? यावर व्यक्त होणारी तरुणाई

टीम महाराष्ट्र देशा – ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल ६० लाख शौचालये बांधण्यात आली असून आता संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात केला. देशात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शौचालये बांधणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून आता विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्र देशाने याच विषयावर तरुणांची मते जाणून घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी केलेला महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा हा शासनाच्या इतर योजनांच्या बाबतीत केलेल्या दाव्याप्रमाणेच खोटा असल्याचं आमच्या विशेष चर्चेत सांगितलं.

2012मध्ये बेसलाईन सर्वे झाला. त्यामध्ये देशात 50 टक्के ग्रामीण भागांत शौचालय नाही, लोक उघड्यावर शौचास जातात असं समोर आलं. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी ऑक्टोबर 2019 पर्यंत हागरणदारीमुक्त करण्याचं निश्चित केलं होतं. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत हे आव्हान स्वीकारल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे. त्यानुसार राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधील, 351 तालुक्यातील, 27 हजार 667 ग्रामपंचायतींमधील 40 हजार 500 गावं ही हगणदारी मुक्त करण्याचं ठरलं.आणि आज महाराष्ट्रातला ग्रामीण भाग हागणदारीमुक्त झाला. असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय

पण या विधानात कितपत तथ्य आहे अजून विरोधकांनी विचारलं. घरोघरी शौचालय बसवली असली तरी अजूनही उघड्यावर शौचाला बसणं संपलेलं नाही. लोकांचं उघड्यावर शौचाला बसणं कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.