fbpx

लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का ? : शोभा डे

टीम महाराष्ट्र देशा- मुक्ताफळे उधळून वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यावर भाष्य करताना लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शोभा डेंच्या या ट्विटमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.