मुंबई : एकीकडे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल? यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी याबद्दल माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी अरविंद सावंत यांनी बंडखोरांवर घणाघाती टीका केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधीत असंतोष आहे. तो असंतोष दाबण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सावंत यांनी केला. राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही माजवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा झाकण्याचा प्रयत्न झाला. ती महत्त्वाची बातमी झाकली गेली. सातत्याने काही भोंगे बोलतात. वाईट भाषेत बोलतात, ते भाजपला मान्य आहे, असे समजायचे का? यावर संजय राऊत साहेब प्रचंड हल्ले करीत होते. आम्हालाही या बाबत प्रतिहल्ले करता येतात.
महत्वाच्या बातम्या :
- Ganesh Chaturthi 2022 | आता रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी, गणपती उत्सवाबाबत शिंदे सरकारचे मोठे निर्णय
- Ramdas Kadam vs Subhash Desai | “कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस जागा झाला” ; सुभाष देसाईंना रामदास कदमांचा टोला
- Breaking News । शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- Patra Chawl Scam | संजय राऊतांनी अलिबागमध्ये 3 कोटींना 10 प्लॉट खरेदी केले, ED च्या आरोपाने खळबळ
- Ajit pawar | अजित पवार यांच्यासह शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<