कॉंग्रेसला धक्का,अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांचा राजीनामा,राष्ट्रवादीत करणार प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा- निवडणुका जवळ येवू लागल्याने अनेक नेतेमंडळी अनुकूल अश्या पक्षात प्रवेश करताना पहायला मिळत आहेत. नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला . आता काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.येत्या १७ नोव्हेंबरला अजित पवार यांच्या उपस्थितीत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस पक्षात अल्पसंख्यांक समाजाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.देश पातळीवर तसेच राज्य पातळीवर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांना कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सतत डावलले जाते. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जात नाही. ही कार्यशैली काँग्रेस पक्षापासून अल्पसंख्यांक समाजाला दूर नेत आहे. भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे असं देखील ते म्हणाले