IRS अधिकारी अनंत तांबे यांचं अवघ्या 32 व्या वर्षी कोरोनामुळं निधन,जावडेकरांनी व्यक्त केला शोक

irs anant tambe

औरंगाबाद – IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ते अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते.

औरंगाबाद शहरातील अमरप्रीत चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते ऑक्सिजनवर होते. उपचारासाठी डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली. उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या ४ दिवसांपासून ते व्हेंटिलेटर होते. डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी १०.५० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जावडेकर यांनी म्हटलं आहे की, श्री. तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचं दु:ख आहे.

महत्वाच्या बातम्या