सिंचन घोटाळा: संथ तपासावरुन कोर्टाने सरकारला झापले

टीम महाराष्ट्र देशा- ज्या सिंचन घोटाळ्याचं भांडवल करून भाजप सरकार सत्तेत आलं आता त्याचा सिंचन घोटाळ्यातील संथ तपासावरुन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सिंचन घोटाळ्यात जनतेचा पैसा गेला, आता लवकर चौकशी पूर्ण करा असे निर्देश देतानाच सरकारला झोपेतून उठवण्याची आवश्यकता असल्याचं सांगत सरकारला हायकोर्टाने फटकारले आहे.

राज्यभरातील सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘जनमंच’ या स्वयंसेवी संस्थेने केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. सिंचन घोटाळ्यातील संथ तपासावरुन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

bagdure

कोर्टाने सरकारला झापले

सिंचन घोटाळ्याची तातडीने चौकशी पूर्ण करण्याची गरज आहे. सरकारला झोपेतून उठवण्याची आवश्यकता असून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करावे किंवा तपासाकरिता लाचलुचपतक प्रतिबंधक विभागाला पुरेसा मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे हायकोर्टाने सांगितले. मुख्य सचिवांनी पुढील सुनावणीवेळी सकारात्मक उत्तर न दिल्यास न्यायालय योग्य आदेश देईल, असे हायकोर्टाने सांगितले.

You might also like
Comments
Loading...