जलसंधारणमंत्री शिंदे करणार ‘जलयुक्त’च्या कामांची पाहणी

सोलापूर: पुणे विभागाची जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर १६ नोव्हेंबर रोजी विविध कामांची पाहणी करणार आहेत. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. दि. १५ रोजी सकाळी १० वाजता आढावा बैठक, वाजता विभागीय स्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार वितरण होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा, २०१६-१७ मधील जलसंधारण कामांचा आढावा, २०१७-१८ चा प्रकल्प अहवाल यावर चर्चा करण्यात येणार आहे.बैठकीस पुणे विभागातील सर्व पालकमंत्री, सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. प्रथमच होतेय विभागीय बैठक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागाची आढावा बैठक होत आहे. बैठकीत २०१५-१६ या वर्षातील सोलापूरसह पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी जलसंधारणमंत्री करणार आहेत

You might also like
Comments
Loading...